संशोधक सोनम वांगचूक ‘रँचो’ने जवानांसाठी बनवला सौरऊर्जेने उबदार होणारा तंबू

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। लडाख – ‘थ—ी इडियटस्’मधील आमीर खानने साकारलेली कल्पक संशोधक ‘रँचो’ची भूमिका सोनम वांगचूक यांच्यावरच आधारित आहे. गलवान खोर्‍यात संशोधक सोनम वांगचूक यांनी सैन्यातील जवानांसाठी एक असा तंबू बनवला आहे ज्याचे तापमान नेहमी पंधरा ते वीस अंश सेल्सिअस राहू शकते. बाहेर उणे वीस अंश सेल्सिअस तापमान असले तरीही आतील तापमान पंधरा अंश सेल्सिअसचे राहील. सौरऊर्जेने उबदार राहणारा हा तंबू 12 हजार फूट उंचीवर असलेल्या गलवान खोर्‍यात जवानांसाठी वरदान ठरू शकतो.

गलवान खोर्‍यातच भारतीय व चिनी सैनिकांमध्ये गेल्यावर्षी जूनमध्ये हिंसक झडप झाली होती. याठिकाणी भारतीय जवानांना तैनात असताना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी वांगचूक यांनी हा टेंट विकसित केला आहे. त्यांनी सांगितले, लडाखमध्ये चोवीस तास वीज उपलब्ध असणे कठीण आहे. त्यामुळे येथे तैनात असलेल्या जवानांना थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी डिझेल किंवा अन्य तेलाच्या सहाय्याने लाकूड जाळून ऊब निर्माण करावी लागते. ते बरेच हानिकारकही ठरू शकते. आता विकसित केलेल्या टेंटमध्ये हिटर लावलेला आहे. हा हिटर सौरऊर्जेने गरम होतो. ही सौरऊर्जा साठवून ठेवण्याचीही यामध्ये क्षमता आहे. अशा एका टेंटमध्ये दहा जवान राहू शकतात. या टेंटचे वजन तीस किलोंपेक्षाही कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *