महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। नवीदिल्ली । वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुसूत्रता आणि अंलबजावणीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. यामध्ये जीएसटीच्या कर टप्प्यांचे विलगीकरण व काही वस्तूंच्या कर टप्प्यात अदलाबदल प्रस्तावित केली आहे. मार्चध्ये होणार्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित असून, सोन्यासारख्या मौलव्यान धातूवर सध्या आकारण्यात येणारा जीएसटी तीन टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्या हा कर 5, 12, 18 व 28 टक्के अशा चार टप्प्यांध्ये आकारला जातो. जर मधल्या दोन टप्प्यांचे सामिलीकरण झाले तर भविष्यात या कराचे तीनच टप्पे अस्तित्वात असतील. असा बदल करताना काही वस्तूही एका टप्प्यातून दुसर्या टप्प्यात हलविल्या जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये मौल्यवान धातू म्हणून ओळखल्या जाणार्या सोन्यावरील कर वाढू शकतात.सध्या या कररचनेच्या बाहेर असलेला स्वयंपाकाचा गॅस या रचनेध्ये येऊ शकतो.
स्वयंपाकाचा गॅस या रचनेत समाविष्ट केला तर त्याच्यावरील कराच्या रूपाने राज्याला मिळणारे सहा हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याखेरीज जून 2022 पासून राज्यांना त्यांच्या कर तुटीबद्दल मिळणारी भरपाईसुद्धा बंद होणार आहे. या पार्श्वभूीवर जीएसटी कौन्सिलची आगामी बैठक होणार आहे. त्याची वेळ व तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी मार्चध्ये जीएसटी रचनेध्ये मोठे बदल संभवतात. त्याच्या अंलबजावणीचा मुहूर्त नव्या आर्थिक वर्षापासून होऊ शकतो.