Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात करोनाचा शिरकाव; आठ कर्मचाऱ्यांना संसर्ग - Maharashtra 24

अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात करोनाचा शिरकाव; आठ कर्मचाऱ्यांना संसर्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ -राज्यातील करोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. करोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांसह व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील अडकत आहेत. आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. एवढच नाही तर राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. दरम्यान आता मंत्रालयात देखील करोनाने पुन्हा एकदा प्रवेश केला असुन, महसुल विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

एकाच विभागात एवढ्या संख्येने कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज महसुल विभागात २२ जण गैरहजर होते, त्यातील आठ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर उर्वरीत जण अन्य आजाराने त्रस्त असल्याने ते गैरहजर असल्याचं समोर येत आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *