महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. २२ – कै. डॉ. सुनील बानखेले यांच्या जन्मस्मृति दिना निमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून आकुर्डि येथील ‘ ओम क्लिनिक ‘ येथे मधुमेह, हिमोग्राम , व थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. अपर्णा बाणखेले ( काळभोर ) यानी केले. डॉ. लाल पैथोलॉजीच्या विशेष सहकार्याने आयोजित शिबिरात २१७ नागरिकांनी सहभाग घेताला .
शिबिराचे उदघाट्न डॉ. प्रशांत देशमुख यानी केले. तर, प्रास्ताविक गुणवंत कामगार प्रकाश परदेशी यानी केले. त्याच बरोबर नागेश्वर मित्र मंडळाचे बाळा वायकर, मंगेश कुटे, किसन कुटे, गणेश पाटेकर यानी केले. या वेळी मधुकर काळभोर, कोडिबा काळभोर, शरद काळभोर , गणेश धुमाळ , किसन काळभोर व सोहेल शेख इ. उपस्थित होते.