Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, नियम पाळा ! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कळकळीची विनंती - Maharashtra 24

पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, नियम पाळा ! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कळकळीची विनंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी ‘पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही नियम पाळा’, अशी कळकळीची विनंती हॉस्पिटलच्या बेडवरून पत्र लिहून राज्यातील जनतेला केली आहे.गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्कच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोनो हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु, कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्यांने गाठलेच. राज्यातील जनतेच्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरकून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केल्याचं आपण पाहिले.
स्वत:ची काळजी म्हणजे कुटुंबातील प्रिय व्यक्तींची आणि समाजाची काळजी आहे. एकजुटीनं, एकमतानं, एकनिर्धारानं कोरोनाला हरवूया, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *