महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। पंढरपूर । माघवारी जयाशुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली.रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.माघवारी जयाशुद्ध एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.