Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
दोन दिवसाच्या ब्रेक नंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका - Maharashtra 24

दोन दिवसाच्या ब्रेक नंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। मुंबई । दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. good returns वेबसाईटनुसार राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये झाला आहे.

यापूर्वी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर होते. तर त्याआधी सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले होते. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली.

आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपयांपर्यंत वाढले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.४४ रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.३१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.१२ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.९८ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *