कराडमध्येही विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट, नगरपरिषदेचा उपक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – कराड – दि. २३ – स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या अनुषंगाने कराड नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली असून, एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आणि तो सुरूही झाला आहे. विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट कराड नगरपरिषद परिसरात सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये गत दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प कराड नगरपरिषदेने केला आहे. या अनुषंगाने दैनंदिन उपक्रम सुरू आहेत.

कराड शहरात स्वच्छतेविषयी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम सुरू असून, कराड नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि प्रदूषण टाळणे, इंधन बचत व्हावी, यासाठी कराड शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त विद्युत वाहनांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. कराड शहरातील जे नागरिक विद्युत वाहनाचा वापर करतील, त्यांना सहज सुलभ विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात आलेला आहे. कराड शहरातील जे नागरिक विद्युत वाहनाचा वापर करीत आहेत, असे विद्युत वाहनचालक मोफत चार्जिंग पॉईंटचा लाभ घेत आहेत. नगरपरिषदेने सुरू केलेल्या या मोफत चार्ंजग पॉइंटबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’मध्ये पर्यावरण समतोलासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना आहेत. या अनुषंगाने चार्जिंग पॉईंट सुरू केलेला आहे. कराड शहरात नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या अनुषंगाने ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक बंदी व कोविड-19 च्या अनुषंगाने मास्कचा वापर करणे अशा विविध उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांचा सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

विद्युत वाहनधारकांसाठी मोफत चार्जिंगची सुविधा नगरपालिकेच्या प्रांगणात उपलब्ध केली आहे. याचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी विद्युत वाहनांचा वापर करावा असे आवाहन कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *