दोन दिवसात सोनं ७५० रुपयांनी महागले , पहा आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ – कमॉडिटी बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये तेजी आहे. सोने ५० रुपयांनी वधारले असून चांदीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसात सोने ७५० रुपयांनी वाढले असून सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६९५० रुपयांवर गेला. याआधीच्या सत्रात सोमवारी सोने ७०३ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४६९०० रुपयांवर बंद झाला होता. तर काल चांदीमध्ये १४५३ रुपयांची वाढ झाली होती. एक किलो चांदीचा भाव ७०४६५ रुपयांवर स्थिरावला होता.

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्के कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले आहे. गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना सोने ४६१९० रुपयांवर स्थिरावले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता.

good returns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४७० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६४७० रुपये आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५४७० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६४७० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ४९५३० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४२८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८३०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *