गुंतवणूक ; पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -पुणे – दि. २३ – . पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट तुम्ही पाच वर्षांसाठी सुरु करु शकतात. तुम्ही या योजनेचे पैसे कॅश किंवा चेकद्वारेही भरु शकता. मात्र, चेक जमा करत असाल तर चेक क्लीअरन्सची तारीख डिपॉझिटची तारीख म्हणून मानली जाईल पोस्ट ऑफिसची स्मॉल सेविंग स्कीम सगळ्यात चांगली आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्हाला चांगली कमाई करता येणार आहे. डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) असं या पॉलिसीचं नाव असून यामध्ये बक्कळ परतावा मिळतो. (post office recurring deposit interest rate calculation invest 10 thousand and get 16 lakhs per year)

या स्कीमअंतर्गत गुंतवणूकदारांना सध्या 5.8 टक्के व्याज मिळत आहे. गेल्या वर्षाच्या 1 एप्रिलपासून हा व्याजदर सुरु आहे. या स्कीम अंतर्गत गुंतवणूकदार दर महिन्याला कमीत कमी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडावं लागेल.

.

10 हजारांच्या गुंतवणुकीवर 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांसाठी मॅच्यूअरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

100 रुपये जमा करा आणि मिळवा 7 हजार
पोस्ट ऑफिसची आणखी एक योजना म्हणजे तुम्ही दर महिन्याला 100 रुपये जमा केले तर या योजनेनुसार तुम्हाला शेवटी 7000 रुपये मिळतील. तुम्ही जर 17 फेब्रुवारी 2021 पासून या योजनेअंतर्गत गुंतवणूक करत असाल तर 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्याचा मॅच्यूरिटी पिरिअड असेल. पाच वर्षात तुम्ही दर महिन्याला शंभर रुपये भरले तर एकूण जवळपास 6000 रुपये रक्कम जमा होईल. या रकमेच्या एकूण 5.8 टक्के व्याज मिळेल.

या योजनेसाठी तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता. जॉइंट अकाउंट अंतर्गत तीन लोक जोडू शकतात. अकाउंट होल्डर अल्पवयीन असेल तर त्या खात्यासाठी पालक असणं जरुरी आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलगा किंवा मुलीच्या नावाने खातं उघडता येऊ शकतं.विशेष म्हणजे या आरडी अकाउंटवर लोनची देखील सुविधा आहे. लगातार 12 हफ्ते भरल्यानंतर किंवा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अकाउंट सुरु ठेवलं तर तुम्हाला लोन मिळू शकतं. तुमच्या अकाउंटमध्ये जितकी रक्कम आहे त्याच्या 50 टक्के रक्कमेची तुम्ही लोन घेऊ शकता. या लोनची रक्कम तुम्ही एकदाच किंवा हप्त्यानेदेखील परत करु शकता. तुम्ही व्याज घेतल्यानंतर किती दिवसांनी परतफेड करताय त्याच्या हिशोबाने व्याजदर लागेल.

या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ध्यातही तुमचं खातं बंद करु शकता. तुमच्याकडे पैसे नसतील किंवा इतर काही कारणाने तुम्ही दर महिन्याला सगल पाच वर्ष पैसे भरु शकणार नाहीत तर तुम्ही तीन वर्षातही आपले पैसे काढून खातं बंद करु शकता. खातं बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जावं लागेल. तिथे गेल्यावर तुम्हा एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे व्याजासकट परत मिळतील. (post office recurring deposit interest rate calculation invest 10 thousand and get 16 lakhs per year)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *