नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या दिवशी पटेलांनी रचला इतिहास ; ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला गोलंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। नवीदिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने इतिहास रचला आहे. अक्षर पटेल भारताकडून डे नाईट कसोटीत पाच विकेट घेणारा पहिल गोलंदाज ठरला आहे. तसेच पिंक बॉल डे नाईट कसोटीत एका डावात सर्वाधिक विकेट घेणारा तो जगातील दुसरा स्पिनर बनला आहे.

अक्षर पटेलने मोटेरा येथील डे नाईट कसोटीत 38 धावा देत सहा विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने पाकिस्तानविरोधात 2016-17 मध्ये दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या डे नाईट कसोटीत 49 धावा देत आठ विकेट घेतल्या होत्या. देवेंद्र डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर आहे. याशिवास पाकिस्तानच्या यासिर शाहने श्रीलंका विरोधात 2017-18 मध्ये 184 धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या. यासिर डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.अक्षर पटेलचा भेदक माराइंग्लंडने आपल्या पहिल्या डावात अक्षर पटेलच्या घातक गोलंदाजीपुढे अक्षरशः नांग्या टेकल्या. अक्षरने जॅक क्रोली (53), जॉनी बेअरस्टो (00), बेन स्टोक्स (06), बोन फॉक्स (12), जोफ्रा आर्चर (11) आणि स्टुअर्ट ब्रॉड (03) यांना तंबूचा रस्ता दाखवला.

इंग्लंड 112 धावांवर सर्वबाद इंग्लंडच्या डावात जॅक क्रोलेने 84 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याच्याशिवाय रूटने 17, विकेटकीपर फलंदाज बेन फॉक्सने 12 आणि जोफ्रा आर्चरने 11 धावा केल्या. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे सात फलंदाज दहाच्या आकड्यालाही स्पर्श करु शकले नाहीत.

टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला. शुभमन गिल अवघ्या 11 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा खाते न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्मासोबत 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीही 27 धावांवर बाद झाला. रोहितने 63 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमधील आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *