महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २५ – अमेरिकन बॉन्ड उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आज सोन्याचे भाव घसरल्याचं दिसून आलं. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सकाळी 11 वाजता सोन्याचा भाव 46500 च्या पातळीवर होता. एप्रिलच्या डिलिव्हरी सोन्याच्या भाव एमसीएक्सवर 79 रुपयांनी घसरून 46443 रुपयांवर बंद झाला. यावेळी 30 रुपयांच्या घसरणीसह 46492 च्या पातळीवर व्यापार होता. जून डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आता 19 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46696 रुपयांच्या पातळीवर होता.
चांदीच्या भावाविषयी बोलायचं झालं तर आज चांदी वधारली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 492 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 70035 च्या पातळीवर होता. तर मे डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 548 रुपयांनी वाढून 71355 रुपयांच्या पातळीवर होता.आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचे दर 1.35 डॉलरने घसरून प्रति औंस 1,796.55 डॉलरवर पोहोचला. तर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत प्रति औंस 28.08 डॉलरवर होती.