ऑस्ट्रेलियात फेसबुकला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। सिडनी । ऑस्ट्रेलियन संसदेने गुरुवारी एक ऐतिहासिक विधेयक मजूर केले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात नवीन मीडिया कायद्याअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशा प्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरलाय. गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन सरकार आणि फेसबुकमध्ये या नवीन कायद्यावरून तणाव निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियन सरकारच्या धोरणाला फेसबुक आणि गुगलनेही आक्षेप घेतला होता. गुगल किंवा फेसबुकला आता त्यांच्या पेजवर बातम्या शेअर करताना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तशा प्रकारचा नवीन कायदा ऑस्ट्रेलियात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या या कायद्याची गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात चर्चा आहे. हिंदुस्थानातही या कायद्यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *