शेतकरी आता 100 रुपये लिटर दराने दूध विकणार ?… भाज्यांचेही दर वाढवण्यात येतील मलकीत सिंह यांचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। नवीदिल्ली । दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी भारतीय किसान युनियन महापंचायतींचे आयोजन करत आहे. विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या भारतीय किसान युनियनने कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. या महासंघाचे जिल्हाध्यक्ष मलकीत सिंह यांनी म्हटलंय की 1 मार्चपासून दूध उत्पादक शेतकरी हे दुधाच्या किंमती वाढवणार आहेत. 50 रुपये लिटर दराने विकले जाणारे दूध आता 100 रुपये लिटर दराने विकले जाईल असे ते म्हणाले आहेत.मलकीत सिंह यांचं म्हणणं आहे की डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावर शेतकऱ्यांनी दूध दरवाढीचा तोडगा काढला असून यापुढेही सरकारने ऐकले नाही तर भाज्यांचेही दर वाढवण्यात येतील असा इशारा सिंह यांनी दिला आहे.

शेतकरी जर त्यांनी पिकवलेले धान्य उद्ध्वस्त करू शकतो तर तुम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही. जेव्हा जेव्हा गर्दी उसळते, त्यावेळी सरकार बदलते, असे प्रत्युत्तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी सोमवारी दिले. तर जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ‘एखाद्या ठिकाणी गर्दी जमली म्हणून कायदे बदलले जाणार नाहीत’ असे विधान केले होते. याला उत्तर देताना शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनेचे राकेश टिकेत यांनी किसान महापंचायती दरम्यान टीका केली. टिकेत म्हणाले की, मंत्री म्हणतात गर्दी जमली म्हणजे कायद्यात बदल केला जाईल असे नाही. परंतु जेव्हा गर्दी उसळते तेव्हा सरकार बदलते, हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. फक्त कृषी कायद्याचाच प्रश्न नसून इलेक्ट्रासिटी बिल, सीड बिल यासारखे अनेक कायद्ये ते आणू पाहत असल्याचा घणाघात टीकेत यांनी यावेळी केला. हा कायदा गरीबांना उद्ध्वस्त करुन टाकेल. प्रश्न फक्त एका कायद्याचा नसून यासारखे आणखीन बरेच कायदे येणार असल्याची टीका देखील टीकेत यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *