स्वस्तात सोने खरेदी करण्याची पुन्हा संधी, 10 ग्रॅम सोने एवढ्या रुपयांना मिळेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २७ – सध्या कोरोनाचा काळ आहे. कोरोना काळात सोने (Gold) दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. सोने दर 50 हजार रुपयांच्या घरात पोहोचला होता. मात्र, अनलॉक सुरु झाल्यानंतर सोने दरात मोठी घसरण होण्यास सुरुवात झाली होती. पुन्हा सोने दरात वाढ होताना दिसत आहे. आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.10 ग्रॅम सोने 4,612 रुपयांना मिळेल. 1 मार्चपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold bond ) विक्रीस प्रारंभ होणार आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्डमधील बॉन्डची (Sovereign Gold bond ) नवीन इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,662 रुपये निश्चित करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 (Series 12th)ची विक्री 1 ते 20 मार्च, 2021 दरम्यान होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आदेशानुसार ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत देण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांना 1 ग्रॅम सॉवरेन गोल्ड बॉन्ड 4,612 रुपये दराने दिले जाईल.

8 वर्षे गोल्ड बॉन्ड
हे सॉवरेन गोल्ड बॉन्ड 8 वर्षांसाठी दिले जातात आणि 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. सोने खरेदी किमान 1 ग्रॅम आणि त्याच्यापुढे तो सोने खरेदी करु शकतो.

4 किलोपर्यंत सोने (GOLD) खरेदी करता येते

एखादा गुंतवणूकदार किमान 1 ग्रॅम आणि 4 किलोपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतो. हिंदु अविभाजित कुटूंबासाठी (HUF) 4 किलोपर्यंत आणि ट्रस्टसाठी एका वर्षात 20 किलो गुंतवणूकची परवानगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *