चौथ्या कसोटीमधून या खेळाडूने घेतली माघार ; इंग्लंडला अजून एक धक्का,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – अहमदाबाद – अहमदाबाद, IND vs ENG : इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या मालिकेत १-२ अशा पिछाडीवर आहे. त्यामध्येच इंग्लंडच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे. कारण इंग्लंडच्या संघातील एक महत्वाच्या खेळाडूने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता थेट तो आपल्या मायदेशी परतणार आहे.इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. वोक्सला भारताविरुद्धच्या कसोटी संघात सामील करण्यात आले होते. पण आतापर्यंत तो एकही कसोटी सामना खेळला नव्हता. पण तरीदेखील या खेळाडूच्या विनंतीनुसार त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय इंग्लंडच्या संघाने घेतला आहे.

वोक्स हा इंग्लंडच्या संघाबरोबर बऱ्याच कालावधीपासून आहे. इंग्लंडच्या संघाबरोबर वोक्स हा दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावरही गेला होता. त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून वोक्स हा इंग्लंडच्या संघाबरोबर बायो-बबलमध्ये आहे. त्यामुळे आता वोक्सने काही दिवस आपल्या कुटुंबियांबरोबर राहण्याची विनंती इंग्लंडच्या संघाला केली होती. त्याची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर रोटेशन पॉलिसीनुसार त्याला इंग्लंडला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली आणि यष्टीरक्षक जोस बटलरलाही इंग्लंडच्या संघाने मायदेशी रवाना केले आहे.
इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जॉनी बेअरस्टो आणि मार्क वुड यांनी संधी देण्यात आली नव्हती. त्याचबरोबर बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना भारताच्या दौऱ्यापूर्वी आराम देण्यात आला होता. पण वोक्सला यावेळी एकही कसोटी सामना भारताविरुद्ध खेळता आला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना फक्त दोन दिवसांतच संपला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता चौथा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना जिंकून इंग्लंडच्या संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी करता येऊ शकते. त्याचबरोबर भारताने हा सामना जिंकला तर त्यांना मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *