इंटरनेट गेम्स खेळण्याचे व्यसन ; मुलांचे भविष्य अंधारात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे -इंटरनेटचा अतिवापर, सतत गेम्स खेळत बसणे ही सगळी इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डरची लक्षणे आहेत. मानसिक, शारीरिक आजाराबरोबर मुलांच्या शिक्षण आणि करिअरवरही त्याचे दुष्परिणाम होत आहे. इटारसी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थी दिवसात 17 तास इंटरनेटवर गेम खेळत होता. त्याला इंटरनेट गेम्स खेळण्याचे व्यसन लागले होते. त्याच्या पालकांनी गेम खेळण्यास नकार दिला. तर मुलाला राग आला आणि बऱ्याच दिवस तो कोणाशीही बोलला नाही. त्यानंतर या मुलाला मनोचिकित्सक डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी पालक आणि मुलांचे दोघांचे ही काउंसलिंग केले .ही काही एक घटना नाही. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील इंटरनेटवरील धोकादायक गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील प्रत्येक मनोचिकित्साकडे दररोज एक-दोन रुग्ण जात आहेत. मनोचिकित्सकांचे असे म्हणणे आहे की, अश्या प्रकारच्या गेममुळे मुलांमध्ये हिंसा वाढ आहे.

काहीं दिवसांपूर्वी 14 वर्षांच्या मुलाने त्याच्या सोबत असलेल्या मित्रांची हत्या केली. डॉ. सत्यकांत म्हणाले की, या इंटरनेटचा गेममध्ये एकमेकांना मारावे लागते. तुम्ही तेव्हाच जिंकता जेव्हा तुम्ही दुसऱ्याला संपवता. हेच कारण आहे की व्हीडिओ गेममुळे मुलांचे स्वभाव बदलत आहेत.” इंटरनेटवरील अशा गेममुळे मुलांमध्ये हिंसा वाढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *