महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ नागरिकांच्या खिश्याला चटका देणारी आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच इतर आवश्य़क वस्तूंचे देखील भाव वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल 5 रूपयांनी वाढले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. ऐकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत, तर दुसरीकडे इंधन दरवाढीचा परिणाम इतर गोष्टींवर होत आहे.
४ मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर आजचे दर 1 फेब्रुवारीचे दर
दिल्ली 91.17 86.30
मुंबई 97.47 92.86
कोलकाता 91.35 87.69
चेन्नई 93.17 88.82
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
शहर आजचे दर 1 फेब्रुवारीचे दर
दिल्ली 81.47 76.48
मुंबई 88.60 83.30
कोलकाता 84.20 80.48
चेन्नई 86.45 81.17
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.