Mahindra ची इलेक्ट्रिक कार, ३७३ किलोमीटरची रेंज; Tata Nexon शी टक्कर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – नवीदिल्ली – Mahindra Electric ने eXUV300 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपो २०२० मध्ये आणले होते. भारतात याला कंपनी यावर्षीच्या अखेर पर्यंत लाँच करू शकते. या कारच्या लाँच आधी आता या कार संबंधी नवीन कोणतीही माहिती समोर आली नाही.

३७५ किलोमीटरची रेंज
या कारच्या संबंधी जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, ही कार ३७५ किलोमीटरची मोठी रेंज सोबत येणार आहे. या मॉडलला कंपनी दोन व्हेरियंट मध्ये लाँच करू शकते. यात स्टँडर्ड व्हेरियंटची रेज २०० किलोमीटर च्या जवळपास असू शकते.

कधी होणार लाँच
या कारच्या लाँचिंगची तारीख कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, या कारला कंपनी २०२१ च्या अखेर पर्यंत किंवा २०२२ च्या सुरुवातीला लाँच करू शकते. या कार द्वारे कंपनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपले मार्केट शेयर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

टाटा नेक्सॉनला थेट टक्कर
महिंद्राच्या या कारची टक्कर थेट टाटा नेक्सॉन शी होणार आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक भारतातील सर्वात यशस्वी इलेक्ट्रिक कार आहे. या कारला आता महिंद्राची ही कार थेट टक्कर देणार आहे. टाटा नेक्सॉन सध्या ३१२ किलोमीटरची रेंज ऑफर करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *