महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज रविवारी एका दिवसात ३४० पॉझिटीव्ह वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ३६०० संशयित रूग्णांचे तपासणी प्रयोगशाळेकडून आज प्राप्त झाले असून यात ३४० कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १८ हजार ६६८ झाला आहे. तर आज एका दिवसात तब्बल २८४ रूग्णांनी डिसचार्ज घेतला असून आतापर्यंत १५ हजार ७७६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान आज बुलडाणा येथील एका ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या आता १९३ झाली आहे. सद्या २६९९ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर ८५८९ संशयित रूग्णांचे अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.