पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, सर्व पात्र व्यक्तींना लस घेण्याचे केले आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली. मोदींनी स्वतः याची माहिती देत सांगितले की, ‘कोरोनाविरुद्ध या वैश्विक लढाईत आपल्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी सर्वोत्तम काम केले आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला कोरोनामुक्त करूयात’. न्यूज एजन्सीनुसार पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची कॅव्हॅक्सिन लस घेतली आहे. पद्दुचेरीची नर्स पी निवेदा यांनी मोदींना लस दिली.

कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आज १ मार्चपासून सुरू होत असून ६० वर्षे पूर्ण केलेले तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना या टप्प्यात प्राधान्यक्रमाने लस दिली जाईल. याशिवाय, सर्वसामान्यांसाठीही लसीकरण सुरू होत असून को-विन 2.0 (Co-WIN2.0) ॲप/ पोर्टलवर सकाळी ९ वाजता नोंदणी सुरू होईल. तसेच लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करता येईल. या टप्प्यात १० हजार सरकारी व २० हजार खासगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्राची योजना आहे. राज्यात हा टप्पा पालिकांच्या तसेच शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतूनही राबवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *