महाराष्ट्रातील लस घेणारे पहिले राजकीय नेते शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) टोचून घेतली. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. (NCP Chief Sharad Pawar take Covid 19 Vaccine in Mumbai)

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

तुम्हाला आता लस मिळू शकते का?
सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *