जिओ युजर्संसाठी , eSIM सपोर्ट आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकाल कॉलिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – भारतीय मार्केटची टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी eSIM सपोर्ट उपलब्ध करीत आहे. eSIM म्हणजेच इंबेडेड सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल होय. जे थेट फोनमध्ये एम्बेड केले जाते. यासारखी सिम फोनमध्ये दिली गेल्यास यात फोनचे स्पेस वाचते. तसेच दोन सिम ट्रे बनवण्याची गरज नाही. हे कोणत्याही मोबाइलच्या रिमोट सिम प्रोविजनिंगला इनेबल करते. eSIM च्या युजर्सला फोनमध्ये कोणतेही सिम कार्ड शिवाय टेलिकॉम सर्विस वापरता येऊ शकते. Reliance Jio युजर्संना ही सुविधा आता मिळू शकणार आहे.

जर तुम्ही Reliance Jio eSIM घेतले तर तुम्हाला एक नवीन कनेक्शन साठी डिजिटल किंवा जिओ स्टोरवर जावे लागेल. त्यानंतर कनेक्शन मिळवण्यासाठी आपला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागणार आहे.

नवीन जिओ ईसिम कनेक्शनला अॅक्टिवेट करण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये एक फीचर डाउनलोड करावे लागेल. eSIM च्या कम्पेटिबल डिवाइस ऑटोमेटिकली या सिमला कॉन्फ़िगर करते. चुकून तुम्ही डाउनलोड केलेल्या ईसिमला हटवले तर तुम्हाला पुन्हा जवळच्या रिलायन्स जिओच्या डिजिटल आणि जिओच्या स्टोरवर जाऊन पुन्हा त्याला अॅक्टिवेट करावे लागेल. यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला फोटो आणि आयडी पुरावा द्यावा लागेल.

सिम कार्ड eSIM मध्ये कन्वर्ट होऊ शकते
फिजिक सिम कार्ड ईसिमध्ये बदल करू शकतो. याचे उत्तर हो असे आहे. Reliance Jio फिजिकल सिम कार्ड ला ज्यात जिओ कनेक्शन अॅक्टिव आहे. त्याला ईसिम मध्ये बदलू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *