देशात प्रथमच पश्चिम रेल्वेवर सहा कोटींची यंत्रणा ; शंभर लोकलमध्ये ही आधुनिक यंत्रणा लागू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – मुंबई – लोकलच्या मोटरमन आणि गार्डशी आपात्कालीन परिस्थितीत पंट्रोलमध्ये बसलेल्या अधिकाऱयांना ‘वन टू वन’ संपर्क करणे सहज शक्य होणार आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे मुंबईकरांची लोकल कुठे पावसात अडकली असेल, किंवा अपघात झाला असेल तर यासंबंधित लोकलच्या क्रु मेंबर्सशी संपर्प साधून तातडीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनाही कोणतीही सूचना देणे त्यामुळे शक्य होणार आहे.

लोकल ट्रेन चालविताना मोटरमन आणि गार्डना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. तसेच मोबाईलचेही नेटवर्क जाण्याचा धोका असतो. त्यामुळे एमटीआरसी यंत्रणा मदतीला आली असून त्यामुळे जीपीएस यंत्रणेच्या मदतीने ट्रेन पुठे आहे हे शोधले जाऊन ट्रेनचा नंबर डायल करताच धावत्या ट्रेनच्या क्रु मेंबर्स, मोटरमन व गार्डशी ‘वन टू वन’ किंवा क्रु मेंबर्सशी एकाच वेळी ग्रुप कॉलद्वारे संभाषण करता येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या शंभर लोकलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली असून तिचे उद्घाटन आज करण्यात आले. या यंत्रणेमुळे प्रवाशांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी दिली. याप्रसंगी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.एल. सत्यकुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठापूर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *