मालिका ३ – १ अशी जिंकणं खूप गरजेचं ; अशी असू शकते भारतीय टीम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – अहमदाबाद – भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा शेवटचा सामना 4 मार्चापासून खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतानं या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. शेवटचा सामना भारतीय संघाला जिंकणं खूप गरजेचं आहे. इंग्लंड संघाला तंबूत पाठवण्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह संघानं कंबर कसली आहे. Playing XIमध्ये जसप्रीत बुमराह ऐवजी कुणाला संधी मिळू शकते जाणून घ्या

सलामी फलंदाज शुभमन गिल चौथ्या सामन्यात ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत तिन्ही सामन्यांमध्ये त्याने विशेष कामगिरी केली नाही मात्र तरीही तो पुन्हा एकदा पहिल्याच टप्प्यात चांगल्या धावा काढण्याच्या प्रयत्नात दिसू शकतो.

हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर उतरेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात हिटमॅननं संघाला तारलं होतं. हिटमॅनची कामगिरी अव्वल असल्यानं या सीरिजमध्ये त्याचा वाटा मोलाचा आहे. पुन्हा एकदा रोहित शर्मा फुलफॉर्ममध्ये बघायला मिळू शकेल अशी आशा आहे.

चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खास असू शकतो. उत्तम कामगिरी करण्यासाठी त्याच्याकडे ही संधी आहे. त्यामुळे तो या संधीचं सोनं करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली स्वत: मैदानात उतरेल. भारतीय संघाला मजबूती देण्याची जबाबदारी यावेळी विराह कोहलीवर असणार आहे. तर विजय जिंकूण ठेवण्याचं तगडं आव्हान या सामन्यात असणार आहे.

उपकर्णधार अजिंक्य राहणे दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाची शानदार कामगिरी केली. यावेळी चौथ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा आपली उत्तम कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

ऋषभ पंत मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये यावेळी पाहायला मिळाला आहे. शेवटच्या सामन्यातही त्याची कामगिरी जबरदस्त असेल असा विश्वास क्रिकेटप्रेमींना आहे.

अक्षर पटेलने तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या होत्या. आपल्य़ा तुफान गोलंदाजीनं इंग्लंडच्या संघातील खेळाडूंची दांडी गुल करण्यासाठी पुन्हा एकदा अक्षर पटेल तयार आहे.

आर अश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात उत्तम कामगिरी केली होती. इतकच नाही तर 8 विकेट्स् घेण्यात यश मिळालं होतं. तिसऱ्या कसोटीमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या. शेवटच्या सामन्यात आर अश्विन पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना पाहायला मिळू शकतो.

कुलदीप यादव सातत्याने प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याची बरीच चर्चा आहे. दुसर्‍या कसोटीतही त्याला संधी देण्यात आली होती जिथे त्याने 2 गडी बाद केले. तिसर्‍या कसोटी सामन्यात तो पुन्हा संघाबाहेर होता. चौथ्या कसोटीत विराट पुन्हा एकदा त्याला संघात संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाल्यामुळे उमेश यादव बरेच दिवस खेळण्याच्या स्थिती नव्हता मात्र आता त्याची प्रकृती उत्तम असल्यानं चौथ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवला घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र आहे. विराट पुन्हा एकदा सिराजला चौथ्या कसोटी सामन्यात संधी देऊ शकेल, त्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *