सर्वसामान्यांच्या कंबरडं मोडणार, इंधन दरवाढ ; भाज्यांसोबत खाद्यतेल डाळी महाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – इंधन दरवाढ दर दिवशी नवे उच्चांक गाठत आहे. एकीकडे पेट्रोल शंभरीजवळ राज्यात पोहोचलं असताना आता महागाई देखील वाढत आहे. या वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. याचं कारण म्हणजे भाज्यांपाठोपाठ आता डाळी आणि खाद्य तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भाज्यांपाठोपाठ आता डाळी आणि खाद्य तेलाच्या किंमतीही वाढल्यात आहेत. डाळींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढल्यामुळे आता गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

तूर आणि मूगडाळ तर शंभरीच्या पार गेली आहे. तर खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या 3 महिन्यांत 35 टक्के वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलं आहे. या महागाईविरोधात सर्वसामान्यांनी रोष व्यक्त केला आहे.

दुसरीकडे केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 8.5 रुपयांची कपात करणं शक्य असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ही दरकपात केल्यानं सरकारच्या तिजोरीवर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नसल्याचाही दावा तज्ज्ञांनी केला. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्याचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होऊ लागला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. काहींनी नव्या ठिकाणी काम सुरू केलं आहे. त्यामुळे पुन्हा कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याआधी वाढत्या महागाईनं खिशाला मोठी कात्री लागली आहे. सगळ्यातून सावरण्याआधीच महागाईचं संकट समोर आलं आहे. त्यामुळे वाढत्या दरवाढीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *