महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं 41 बॉल आणि चार विकेट्स राखून विजय मिळवला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यानं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले. पोलार्डनं अकिला धनंजय (Akila Dhananjay) याच्या एका ओव्हरमध्ये हा रेकॉर्ड केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड करणारा पोलार्ड हा तिसराच खेळाडू आहे. यापूर्वी युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) यांनी ही कामगिरी केली होती. युवराजनं टी-20 क्रिकेटमध्ये तर गिब्जनं वन-डे क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड केला होता.
वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये पोलार्डनं ही कामगिरी केली. पोलार्डनं या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 38 रन काढले. यामध्ये एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे पोलार्डनं हे सिक्स मैदानाच्या वेगवेगळ्या दिशेला न मारता एकदम सरळ लगावले. युवराज सिंहनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला 6 सिक्स लगावले होते. त्यानंतर पोलार्डनं तब्बल 14 वर्षांनी या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पोलार्डला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आले. पोलार्ड मैदानात आला तेंव्हा वेस्ट इंडिजच्या चार विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर त्यानं ही वादळी खेळी करत टीमला जिंकून दिले. युवराज आणि पोलार्ड शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनं ही कामगिरी केली असून त्यानं 2007 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध हा रेकॉर्ड केला आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 132 रनचं आव्हान होतं. ते त्यांनी 13.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह तीन मॅचच्या या मालिकेत वेस्ट इंडिजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरी मॅच 6 मार्च रोजी होणार आहे.