या प्रसिद्ध विदेशी कंपनीने देशी ‘पार्ले जी’ला खेचलं कोर्टात ; बिस्किटांच्या डिझाइनशी संबंधित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – नवीदिल्ली – गेली 80 वर्षं भारतीयांच्या जिभेचे बिस्किट चोचले पुरवणारी प्रसिद्ध कंपनी पार्ले जीविरुद्ध (Suit against Parle G) दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. हे प्रकरण बिस्किटांच्या डिझाइनशी संबंधित आहे. पार्लेजीनं आमचं बिस्किटांचं डिझाइन चोरलं म्हणून केस दाखल झाली आहे, तीही जगप्रसिद्ध कंपनीने. भारतात बिस्किटांच्या डिझाईनच्या कॉपीबाबत पूर्वीपासून विविध कंपन्यांची बरीच प्रकरणं कोर्टात गेलेली आहेत. ओरिओ बिस्किटं बनवणारी प्रसिद्ध कंपनी मॉण्डेलीझ इंटरनॅशनलने (Mondelez international) पार्लेविरोधात (parle Vs Oreo) दावा ठोकला आहे.

ओरियोनं दावा केला आहे, की पार्ले फॅबियो (parle fabio) बिस्किटाचं डिझाईन तंतोतंत त्यांच्या ओरियोसारखं आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं 12 एप्रिलला सुनावणी करण्याचा निर्णय आहे. अमेरिकेच्या मॉण्डेलीज इंटरनॅशनलचं युनिट असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल ग्रेट ब्रँड्सनं ट्रेडमार्कचं उल्लंघन झाल्याचं प्रकरण दाखल केलं. (parle G biscuit design copy case) ही माँडेलीझ तीच प्रसिद्ध कंपनी आहे, ज्यांनी कॅडबरीचा ब्रँडही विकत घेतला आहे.

9 फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी झाली. हायकोर्टानं ओरियोच्या वकिलाची तातडीनं सुनावनी घेण्याबाबतचं अपील फेटाळून लावलं. आणि पुढची सुनावणी एप्रिलमध्येच होईल असं सांगितलं. (parle G Fabio design Oreo copy)

मॉण्डेलीझनं भारतात जवळपास 10 वर्षांपूर्वी ओरिओ लाँच केलं होतं. पार्लेनं मागच्या वर्षी जानेवारीत फॅबिओ या प्रॉडक्ट लॉन्च केला होता. ओरियोनं आतापर्यंत या ब्रँडच्या सर्व प्रकारांना लॉन्च केलं आहे. यात चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, क्रीम आणि स्ट्रॉबेरी आहेत. (Oreo files case against Parle)

खरं पाहिल्यास देशात पारले जी एकदम स्वस्त आणि ग्लुकोज बिस्किटांसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात याला मोठी मागणी आहे. मात्र मागच्या 10-15 वर्षात शहरी भागात पारलेचा प्रीमियम बिस्किटांशी संघर्ष होतो आहे. विशेषतः ब्रिटानिया, मॉण्डेलीझ, आयटीसी अशा कंपन्यांनी शहरी भागात प्रीमियम बिस्किटांवर फोकस केला आहे. हेच कारण आहे, की पारलेनंसुद्धा या प्रीमियममध्ये आपली स्थिती बळकट बनवण्यासाठी अशा महाग बिस्किटांच्या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे. (parle Delhi high court Oreo case)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *