‘या’ दिवशी लाँच होणार OPPO F19 Pro 5G स्मार्टफोन,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.४ मार्च – नवीदिल्ली – अखेर OPPO F19 Pro 5G सिरीजच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिरीजमधील स्मार्टफोन्स 8 मार्च रोजी भारतात लाँच केले जातील. हे फोन भारतात अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील. ओप्पोची ही नवीन सिरीज ओप्पोच्या F17 सिरीजला पुढे घेऊ जाणार (Successor) आहे. (OPPO F19 Pro 5G will launch on 8th March in India)

या सिरीजमध्ये Oppo F19, Oppo F19 Pro आणि Oppo F19 Pro+ 5G हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले जातील. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये (फीचर्स) लीक झाली आहेत. तिन्ही स्मार्टफोन्सच्या नावावरुन कळतंय की, केवळ OPPO F19 सिरीजमधील केवळ OPPO F19 Pro + 5G या स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी मिळेल. या फोनचा यापूर्वीच Google ARCore डिव्हाईसेसच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतींबाबत कोणताही खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही.

OPPO F19 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचांचा पंच-होल AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबतच फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा + 8MP (अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स) + 2MP (मोनोक्रोम) + 2MP (मॅक्रो) सेंसरचा समावेश असेल. सोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल. OPPO F19 Pro स्मार्टफोन ColorOS 1 अँड्रॉयड 11 वर आधारित असेल. यामध्ये 4,310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जो 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल.

OPPO F19 Pro+ 5G चे फीचर्स
OPPO F19 Pro+ 5G च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.4 इंचांचा पंच होल AMOLED डिस्प्ले मिळेल. सोबतच हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरने सुसज्ज असा असेल. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेस मिळेल. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 30W च्या फास्ट चार्जिंगसह 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *