फि वसुलीसंदर्भात छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकार्यांनी घेतली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट

Spread the love

शिक्षण सम्राटांनी अतिरिक्त फी वसुली स्वेच्छेने थांबवावी…

उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनाही निवेदन सुपूर्द

। मुंबई । लाईव्ह महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांच्या फी वसुलीसाठी जो तगादा लावण्यात येत आहे, या विरोधात छावा स्वराज्य सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान याच पार्श्वभूमिवर छावा स्वराज्य सेनेचे पदाधिकारी गुरुवार दिनांक 4 मार्च रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. व फी वसुली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. व त्या दरम्यान शिक्षण सम्राटांनीही फी मध्ये सवलत द्यावी, जे काही अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले आहे ते शिक्षण व्यवस्थापनाने त्वरित माफ करावे, विद्यार्थांना वर्षभरात ज्या अॅक्टिव्हिटींचा लाभ घेता आला नाही त्याचे शुल्क माफ करावे. यासाठी शासन पातळीवर अद्यादेश काढणयाची काय आवश्यकता, असे मत वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान सदर निवेदनाची प्रत उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनानी सुपूर्द करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या धामधुमीत वेळात वेळ काढून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट दिल्याबद्दल छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

———————————————————————-

यावेळी डी. वाय. पाटील. महाविद्यालय पिंपरी येथील व्यवस्थापनाच्या फी वसुलीसंदर्भातही वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डी. वाय. पाटील महाविद्यालय फी वसुलीसाठी तगादा लाऊ शकत नाही व कोणत्याही विद्यार्थ्याला परिक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी पुणे जिल्ह्याचे शिक्षण मंडळाचे सह संचालक दिनकर टेमकर यांच्याशी छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकार्यांशी भेट घालून दिली. व निवेदनासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. याच चर्चेदरम्यान अतिरिक्त शुल्क वसुलीविरोधात उच्च न्यायालयात शासनाने दाद मागितली असल्याचे टेमकर यांनी सांगितले. व डी. वाय. पाटील संदर्भात पुणे जिल्हा शिक्षक मंडळाचे उपसंचालक औदुंबर उकीरडे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात येणार आहे. या संबंधित लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन छावा स्वराज्य सेनेला देण्यात आले.

फी वसुलीबाबत जर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर छावा स्वराज्य सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यामाध्यमातून सर्वासामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व या आंदोलनास महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी केले आहे.

वर्षा गायकवाड यांना निवेदन देतेवेळी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश संघटक, विवेक अत्रे, पुणे जिल्हा आयटी प्रमुख सुलतान बागवान, नितीन पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *