महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च –जर तुम्ही व्हॉट्सऍप डेस्कटॉपवर वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण आता व्हॉट्सऍप तुम्ही डेस्कटॉपवर वापरत असतानाही व्हीडिओ किंवा वॉईस कॉल करू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी किंवा कामानिमित्त डेस्कटॉपवर व्हॉट्सऍप वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर हा खूप मोठा दिलासा आहे. ट्विटरवरून व्हॉट्सअपने तशी माहिती दिली आहे.
या घोषणेसोबतच व्हॉट्सऍपने पुन्हा एकदा प्रायव्हसीच्या मुद्द्याला हात घातलाय. एका यूजरने दुसऱ्या यूजरला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून केलेला कॉल किंवा मेसेज हा सुरक्षित असतो, तो इतर कुणालाही पाहता किंवा ऐकता येत नसल्याचं व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलंय. याशिवाय लवकरच व्हॉट्सअॅप ग्रूप वॉईस आणि व्हीडिओ कॉलचं फिचर आणणार असल्याचं कंपनीने सांगितलंय.
Sometimes you just need a little more space. Secure and reliable, end-to-end encrypted voice and video calls are now available on our desktop app. Download now: https://t.co/JCc3rUunoU pic.twitter.com/PgCl76Mn7U
— WhatsApp (@WhatsApp) March 4, 2021
विंडोज आणि आयओएस या दोन्ही सिस्टिमवर व्हॉट्सअॅप कॉलिंग करता येईल, असं सांगण्यात आलंय.
संगणकावरून व्हॉट्सअॅप वॉईस कॉल कसा करायचा?
यासाठी तुम्हाला तुमचा फोन कॉम्प्युटरला जोडावा लागेल, आणि चांगलं इंटरनेट कनेक्शनही लागेल.
व्हॉट्सअॅपला तुमच्या कॉम्प्युटरत्या मायक्रोफोनचा किंवा वेबकॅमचा अक्सेसही द्यावा लागेल.
ज्याच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याचं खाजगी संभाषण उघडून वॉईस कॉलचा ऑप्शन तुम्हाला निवडावा लागेल.
संगणकावरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल कसा करायचा?
ज्याच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याचं खाजगी संभाषण उघडावं लागेल.
त्यानंतर व्हीडिओ कॉलचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता.
सध्याच्या घडीला तरी संगणकावरून व्हॉट्सअॅपचा खाजगी वॉईस किंवा व्हीडिओ कॉल करता येणार आहे, ग्रूप कॉलिंग करता येणार नाही.
कोविड आणि लॉकडाऊनमुळे व्हॉट्सअॅपचं वॉईस आणि व्हीडिओ कॉलिंग वाढलंय. त्यामुळे आता कॉम्प्युटरवरूनही व्हॉट्सअॅपचं वॉईस आणि व्हीडिओ कॉलिंग सुरू झालं, तर गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट ऑफीससारख्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.