महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ५ मार्च – लसीकरणामध्ये प्रायव्हेट सेक्टरला सामिल केल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा भारतात एका दिवसात जवळपास 14 लाख डोज देण्यात आले. बुधवारच्या तुलनेत हे 40% जास्त आहे. गेल्या चार दिवसांमध्ये देण्यात आलेल्या डोजची संख्या दुप्पट झाली आहे. 1 मार्चला 5.52 लाख डोज देण्यात आले होते. जे 4 मार्चला वाढून 13.88 लाख डोज झाले. म्हणजेच थेट दुप्पट जास्त वाढ झाली.
आरोग्य मंत्रालयानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या डेटानुसार भारतात आतापर्यंत 1.80 कोटी डोज देण्यात आले आहेत. यामध्ये 1.47 कोटी लोकांना कमीत कमी पहिला डोज मिळाला, तर 32.08 लाख लोकांना दुसरा डोज देण्यात आला आहे.
देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीपासून हेल्थकेअर वर्कर्सला दुसरा डोज देण्यात येत आहे. फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्याची सुरुवात 2 मार्चला झाली आणि बुधवारी जवळपास 3,500 फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्यात आला. 1 मार्चपासून सरकारने सीनियर सिटीजन आणि 45-59 वर्षांच्या गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या लोकांना लसीकरणात सामिल करण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही लस देण्यासाठी अधिकृत केले. यानंतरपासून आकड्यांमध्ये वाढ होत आहे.
लसीकरणाच्या 48 व्या दिवशी एकूण 13.88 लाख डोज देण्यात आले. यामध्ये 10.56 लाख पहिले डोज होते. तर 3.31 लाख दुसरे डोज म्हणून देण्यात आले.
हे मिळून आतापर्यंत 1.48 कोटी पहिले डोज आणि 32.08 लाख दुसरे डोज देण्यात आले आहेत. एकूण झाले 1.80 कोटी डोज. रोज व्हॅक्सीन डोज लावण्यामध्ये केवळ अमेरिका मागेसंपूर्ण जगात रोज व्हॅक्सीन डोज देण्याच्या बाबतीत भारतात आता केवळ अमेरिकाच मागे आहे. अमेरिकेत यावेळी केवळ 17 लाख लोकांना रोज कोरोना व्हॅक्सीन दिली जात आहे. जवळपास 14 लाख डोज रोजच्या हिशोबाने भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. UK यानंतर दिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे रोज जवळपास साडे तीन लाख लसी दिल्या जात आहेत.