महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – अहमदाबाद – दि. ५ मार्च – इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने आज ( दि. ५ ) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ९०० वा बळी टिपला. याचबरोबर अँडरसन हा ९०० विकेट घेणार इंग्लंडचा पहिला आणि जागतिक स्तरावरील सहावा गोलंदाज ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपहारास काही वेळ शिल्लक असतानाच अँडरसनने भारताला चौथा धक्का दिला. त्याने २७ धावांवर खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला बाद केले. ही त्याची ९०० वी विकेट ठरली. अँडरसनने कसोटीत ६१३ एकदिवसीय सामन्यात २६९ तर टी – २० मध्ये १८ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ३८ वर्षाचा हा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे आणि वासिम अक्रम यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.