भारतीय संघ आयसीसीच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये या क्रमांकावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.७ मार्च – मुंबई – इंग्लंडचा कसोटी मालिकेमध्ये 3-1 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयसीसीने या कसोटी मालिकेच्या निकालानंतर नव्या क्रमवारीची घोषणा केली. टीम इंडियाकडे या क्रमवारीत 122 गुण आहेत, तर न्यूझीलंडच्या खात्यात 118 गुण आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय क्रमवारीत भारतीय टीम 117 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि टी-20 क्रमवारीत 268 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीम टॉप-3 मध्ये आहे. कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या, श्रीलंका सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे.

श्रीलंकेमध्ये इंग्लंडची टीम कसोटी मालिका 2-0 ने जिंकून भारतात आल्यामुळे इंग्लंडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात आली होती, पण त्यांनी निराशा केली. मालिकेमधील या पराभवानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

कसोटी मालिका संपल्यानंतर आता पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. हे सगळे सामने अहमदाबादमध्येच खेळवले जाणार आहेत. 12 मार्च, 14 मार्च, 16 मार्च, 18 मार्च आणि 20 मार्चला हे सामने होणार आहेत. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात होणार आहे. 23 मार्च, २6 मार्च आणि 28 मार्चला एकदिवसीय सामने होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *