दहावी-बारावी शिकलेल्यांना सूवर्ण संधी …… रेल्वेत मुलाखत नाही थेट नोकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । मुंबई ।दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने मध्य रेल्वे apprenticeship साठी भरतीची घोषणा केली आहे. एकूण 2 हजार 532 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी 5 मार्च 2021 ही अर्जकरण्याची शेवटची तारीख आहे.

ही भरती पुणे, मुंबई, सोलापूर, नारपूर आणि भुसावळ या मुख्य स्थानकांसाठी होणार आहे. त्याच बरोबर मनमाड वर्कशॅाप, परळ वर्कशॅाप आणि मुंबई-कल्याण डीजेस शेडसाठी करण्यात येणार आहे

पदाबद्दलची सविस्तर माहिती
कॅरेज आणि वेगन-258
मुंबई कल्याण डिझल शेड-53
कुर्ला डीजल शेड-60
सीनियर DEE (TRS) कल्याण- 179
सीनियर DEE (TRS) कुर्ला- 192
परळ वर्कशॅाप- 418
माटुंगा वर्कशॉप-547
S&T वर्कशॉप, भायखळा: 60

पात्रता
शैक्षणिक पात्रतेची अट ही दहावी पास आहे. त्याच बरोबर मान्यताप्राप्त बोर्डातून कमीतकमी 50 टक्के मार्क मिळालेले असावेत.
तसेच राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेची मान्यता असलेले ट्रेड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षां दरम्यान हवे.

निवड प्रक्रिया
थेट नियुक्ती प्रक्रिया आहे, यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.

अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील अर्जदारासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे. त्याचबरोबर एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूबीडी (PWBD) आणि महिला अर्जदारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *