पुण्यात लॉकडाऊन नाही , शाळा 31 मार्चपर्यंत बंद, काय सुरु, काय बंद?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १२ मार्च – पुणे – राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Pune Night Curfew Lockdown Latest Update)

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.

तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.

पुण्यात काय सुरु, काय बंद?
💠पुण्यात लॉकडाऊन नाही
💠पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
💠पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
💠लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
💠31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
💠हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
💠उद्यान एकवेळ बंद राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *