सोने-चांदी दरामध्ये मध्ये मोठी घसरण; आज इतक्या रुपयांनी स्वस्त झाले सोने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १२ मार्च – पुणे – कमॉडिटी बाजारात आज नफावसुली दिसून आली आहे. आज शुक्रवारी सोन्याचा किमतीत ३३४ रुपयांची घसरण झाली असून चांदीचा भाव ९०० रुपयांनी कमी झाला आहे.आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा भाव ४४४७९ रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या प्रती १० ग्रॅम सोने दर ४४५४५ रुपये असून त्यात ३३४ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी गुरुवारी सोने ५१ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४४८४३ रुपयांवर स्थिरावला होता. आज सकाळी बाजार उघडताच सोने दरात १५१ रुपयांची घसरण झाली होती. नंतर घसरण वाढत गेली.

आज चांदीच्या किमतीत देखील नफेखोरी दिसून आली आहे. सध्या एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६६२९ रुपये आहे. त्यात ९१३ रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारी बाजार बंद होताना चांदीचा भाव १३८ रुपयांनी वधारून ६७६१३ रुपये झाला होता.

good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३५३० रुपये इतका खाली आला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत १८० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४५३० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४००० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८००० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२१०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४५९३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६९४० रुपये आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच १.९ लाख कोटी डॉलर्सच्या करोना आर्थिक पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. तसेच मागील काही दिवसात अमेरिकेत बॉण्ड यिल्डमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उचलत गुंतवणूकदारांनी अमेरिकन बॉण्ड मार्केटमध्ये खोऱ्याने पैसे गुंतवले आहेत. डॉलरच्या मूल्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचा परिणाम जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीवर झाला असल्याचे मत कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *