31 मार्चपर्यंत नाशिक शहरातील शाळा बंद : मनपा आयुक्‍त

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च ।नाशिक । देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या पहिल्या १० शहरात नाशिकचा समावेश असून, कठोर उपाययोजना केल्या जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी शहरातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहतील, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली .दहावी आणि बारावी मात्र पालकांच्या संमतीने सुरू राहू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक मध्ये कोरोना बधितांची संख्या वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी तातडीने खाते प्रमुखांची बैठक घेतली.कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन केली आहे. दोन हेल्पलाईन नंबरही देण्यात येतील. तसेच आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता पालिका कर्मचारी रस्त्यावर दिसतील असंही ते म्हणाले. गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *