Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पेट्रोल-डिझेल ऐन महागाईत भर का स्थिर ? वाचा आजचे ताजे दर - Maharashtra 24

पेट्रोल-डिझेल ऐन महागाईत भर का स्थिर ? वाचा आजचे ताजे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च ।पुणे । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 14th march 2021)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज म्हणजेच रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *