आज इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना ; फलंदाजीत सुधारणेचे भारतापुढे आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च ।अहमदाबाद । जागतिक दर्जाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने मोठ्या फरकाने हार पत्करली. आता रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीत सुधारणेचे आव्हान भारतापुढे असेल.

तीन महिन्यांनंतर प्रथमच भारतीय संघ शुक्रवारी खेळलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात के. एल. राहुल, हार्दिक पंड्या आणि यजुर्वेंद्र चहल यांच्यासारखे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील तारांकित खेळाडू अपयशी ठरले. परिणामी इंग्लंडने भारताविरुद्ध सर्व विभागांमध्ये मात केली. एका पराभवाने मालिकेतील आव्हान संपुष्टात येत नाही. कर्णधार विराट कोहलीनेही सामन्यानंतर हे मान्य केले. ऋषभ पंत आणि पंड्याकडून स्फोटक आणि मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, असे कोहलीने सांगितले. पंतने २१ आणि पंड्याने १९ धावा केल्या.

 

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *