लवकरच या कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च ।मुंबई । चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Oppo या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लाँच करण्याची योजना आखत आहे. जीएसएमअरेनाच्या रिपोर्टनुसार हा Oppo X 2021 प्रमाणे रोलेबल फोन नसेल, हा फोन फोल्डेबल असेल.ओप्पो व्यतिरिक्त, शाओमी, विवो आणि अगदी गुगल देखील 2021 मध्ये फोल्डेबल डिव्हाइस लाँच करण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातंय की यासाठी सॅमसंग कंपनी फोल्डेबल ओएलईडी डिस्प्ले पॅनेल विकसित करण्यावर काम करत आहे.’द एलेक’च्या रिपोर्टनुसार Oppo मध्ये क्लॅमशेल डिझाईनची सुविधा असेल, ज्यामुळे हा फोन वरुन खालच्या बाजूला फोल्ड होईल. अनफोल्ड केल्यानंतर याचा डिस्प्ले 7.7 इंचांचा होईल. तर बाहेरची स्क्रीन 1.5 ते 2 इंचांची असेल.

शाओमी कंपनीदेखील इन-फोल्डिंग डिझाईनवर स्विच करण्याच्या तयारीत आहे. कारण कंपनीने 8.03 इंचांच्या डिस्पेलसह स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. सर्च इंजिन दिग्गज गुगलने सॅमसंगकडे विनंती केली आहे की, कंपनीने त्यांच्यासाठी 7.6 इंचांच्या आकाराचा एक फोल्डेबल ओएलईडी पॅनल विकसित करावा.सॅमसंगने नुकताच गॅलेक्स झेड फ्लिप 5 जी प्रमाणे एका क्लॅमशेल फोल्डेबल फोनसाठी एक पेटन्ट रजिस्टर केलं आहे. परंतु यामध्ये एक मोठा कव्हर डिस्प्ले आणि अधिक कॅमेरे दिले जाऊ शकतात. (Note : ही बातमी IANS कडून घेतली आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *