महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । पुणे ।कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी देशात लॉकडाउन केले. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. त्यातून परिस्थिती हळूहळू सुधारत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. इंधन दरवाढीचा फटका नागरिकांना बसत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचे भावही सातत्याने वाढत आहेत. वर्षभरात १५ किलो डब्यामागे ८०० ते १००० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडत आहे.
कोठून होते तेलाची आयात ; इंडोनेशिया, मलेशिया, अर्जिटिना, ब्राझील, स्वित्झर्लंड आणि युक्रेन
पाम तेल – हॉटेल्स, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून मागणी.
सूर्यफूल, शेंगदाणा तेल – घरगुती ग्राहकांकडून मागणी.
१) कोरोना प्रादुर्भावामुळे सुरवातीच्या काळात परदेशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प.
२) केंद्र सरकारचे तेलावरील आयात शुल्क जास्त.
३) परदेशातील तेलबिया उत्पादित भागात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान.