Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
२० वर्षांनंतर येणार 'गदर'चा सिक्वेल - Maharashtra 24

२० वर्षांनंतर येणार ‘गदर’चा सिक्वेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १७ – मुंबई -साधारण २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेमकथा’ हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. यातील सनी देओल आणि अमीषा पटेल या जोडीमधील केमिस्ट्रीचं कौतुक झालं होतं. आता २० वर्षांनंतर चित्रपटाची आठवण काढण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या संहितेवर काम सुरु आहे असं कळतंय. सिक्वेलमध्ये सनी आणि अमीषा दोघंसुद्धा असतील असं बोललं जातंय. पण सिनेमातला त्या दोघांचा मुलगा जीतेला केंद्रभागी ठेवून दुसऱ्या भागाची कथा लिहिली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. आता हा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर कशा प्रकारे कमाई करतो हे बघणं औत्सुक्याचं असेल.

गदर चित्रपटात सनी आणि अमीषा यांच्या मुलाची भूमिका साकारलेला अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *