पुण्यात होणारी भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका रद्द होऊ शकते ; BCCIने घेतला हा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १७ – मुंबई -भारत आणि इंग्लंड (india vs england) यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. हे सर्व सामने पुण्यात होणार आहे. पण आता ही मालिकेवर रद्द होण्याचे संकट आले आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार देशातील सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या गेल्या आहेत. करोना व्हायरसचे रुग्ण वाढल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने सर्व वयोगटातील क्रिकेट सामने स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यामुळे विनू मांकड ट्रॉफीसह सर्व स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. भारतात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढत चालली आहे. यामुळेच बीसीसीआयने आयपीएलच्या १४व्या हंगामाआधी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे. सध्या मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी वनडे मालिका स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करोना व्हायरसमुळे २०२०-२१ मधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा उशिरा सुरू झाली होती. देशभरात लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर आयपीएलच्या १४व्या हंगामाासाठी लिलाव झाला. टी-२० स्पर्धेनंतर बीसीसीआयने विजय हजार ट्रॉफीचे आयोजन केले. महिला संघाच्या वनडे मालिकेचे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार होता. पण आता ही स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *