Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
‘रात्रीस खेळ चाले 3’ मालिकेचा थरार या दिवसापासून अनुभवता येणार - Maharashtra 24

‘रात्रीस खेळ चाले 3’ मालिकेचा थरार या दिवसापासून अनुभवता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १७ – मुंबई -झी मराठी वाहिनीवरील गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका असणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता त्याच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून झी मराठी वाहिनीने एक पोस्टर शेअर केले आहे. अण्णा नाईक यांची बंदुक या पोस्टरमध्ये दिसत आहे. सोबतच पुन्हा गोळी सुटणार अण्णा नाईक पुन्हा येणार, असे त्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पण, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली आहे.

आता या दोन्ही भागांतील पात्र तिसऱ्या भागात कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सगळ्या प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहता या मालिकेचा तिसरा भाग आणण्याचा निर्णय झी मराठी वाहिनीने घेतला आहे. २२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी या वाहिनीवर या मालिकेचा तिसरा भाग हा पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *