महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पुणे । मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभर रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. तर डिझेलही ९० रुपयांवर पोहचलं आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढ झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज, बुधवारीही इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्यामुळे देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे. तसेच देशात सुरु असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल ६८ डॉलर इतकी कच्या इंधनाची किंमत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती सातत्यानं बदलत असल्यामुळेच भारतामध्ये इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. देशातील मार्केटमध्ये इंधन कंपन्याने लागोपाठ १८ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली नाही. याआधी २७ फेब्रुवारी रोजी देशात पेट्रोल -डिजलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. मार्च महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९१.१७ रुपये इतकी आहे. तर डिझेल ८१.४७ रुपये प्रतिलीटरमध्ये मिळतेय. दिल्लीतील आतापर्यंतची ही सर्वात जास्त किंमत आहे. याआधी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९० रुपयांपेक्षा पुढे गेलं नव्हतं.
पेट्रोल-डिझेलचे भाव –
पुणे –
पुण्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.१९ इतकी आहे. तीन महिन्यात पेट्रोल प्रतिलिटर १० रुपयांनी वाढलं आहे डिझेलची किंमत प्रतिलिटर ८६.८८ रुपये इतकी आहे. तीन महिन्यात पुण्यात डिझेल जवळपास साडेअकरा रुपयांनी महागलं आहे.
मुंबई –
मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९७.५७ रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८८.६० रुपये इतकी आहे. महिनाभरापूर्वी मुंबई पेट्रोल प्रतिलिटर ९१.५४ रुपये होती. तर तीन महिन्यापूर्वी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८७.८ रुपये इतकी होती. तीन महिन्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर जवळपास १० रुपयांनी महागलं आहे.