महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १९ – मुंबई – टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका (india vs england odi series 2021) खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने (bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिनही सामन्यांचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या (maharashatra cricket association) गंहुजे स्टेडियमवर (gahunje stadium) करण्यात आले आहे. (bcci announced team india for odi series against england)
कृणाल पांड्याला संधी
कृणाल पांड्या. टीम इंडियाचा टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू. कृणालला इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. पांड्याने 2018 मध्ये टी 20 क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यानंतर म्हणजेच आज तब्बल 3 वर्षानंतर कृणालला एकदिवसीय टीममध्ये संधी मिळाली आहे. या निमित्ताने कृणालचे एकदिवसीय पदार्पण ठरणार आहे. तसेच मुंबईकर सूर्यकुमार यादवला टी 20 नंतर या वनडे सीरिजसाठीही संघात समाविष्ठ करण्यात आले आहे.
गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी
गोलंदाज प्रसिद्ध कृष्णालाही वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आली आहे. प्रसिद्धने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला त्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले आहे. कृणाल आणि प्रसिद्ध या दोघांना संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा क्रीडा वर्तुळात होती. अखेर तो अंदाज खरा ठरला आहे.
या एकदिवसीय मालिकेसाठी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कलला संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र या दोघांना संधी मिळाली नाही. या दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती. पृथ्वी शॉ एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तर देवदत्त सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. विशेष म्हणजे देवदत्तने सलग 4 शतकं लगावण्याची कामगिरी केली होती.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.