महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च ।मुंबई । Gold Jewellery Hallmarking: सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक केले आहे. 1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसने सर्व नोंदणीकृत ज्वेलर्सना एक अधिसूचना जारी केलीय. सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेटचे टप्पे असतील. ग्राहक आणि ज्वेलर्स दोघांनाही याचा फायदा होणार आहे. या गुणवत्तेबद्दल या दोघांमध्येही स्पष्टता आहे. (After June 1 There Will Be No Sale Of Gold Without Hallmark, Only 3 Quality Gold Jewellery Will Be Sold)
सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. सध्या ते अनिवार्य नाही. पूर्वी त्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2021 होती. ज्वेलर्स असोसिएशनच्या मागणीनुसार ती मुदत 1 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि ते वापरतोही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत दरवर्षी सुमारे 700-800 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत ज्वेलर्स बीआयएसच्या ए अँड एच सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि तिची गुणवत्ता तेथे तपासतात.
बीआयएसकडे नोंदणी प्रक्रिया ज्वेलर्ससाठी अधिक सोपी केली गेली आहे. हे काम आता घरूनही करता येईल, यासाठी www.manakonline.in या संकेतस्थळावर जा. ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे, ती सबमिट करायची आहेत आणि नोंदणी फी जमा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार बीआयएसचा नोंदणीकृत ज्वेलर्स बनतो.
बीआयएस नोंदणी फीसुद्धा खूप कमी ठेवण्यात आलीय. जर ज्वेलर्सची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी असेल तर यासाठी नोंदणी फी 7500 रुपये आहे, पाच कोटी ते 25 कोटी दरम्यानच्या उलाढाल असल्यास नोंदणी फी वर्षाकाठी 15 हजार रुपये आणि 25 कोटी असू शकते, तर अधिक उलाढालीसाठी नोंदणी फी 40 हजार रुपये आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल 100 कोटींच्या पलीकडे असेल तर ही फी 80 हजार रुपये आहे.