महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च ।मुंबई । आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) आता एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Jolly LLB 3 मध्ये अक्षय वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळेल.एक फिल्म झाली तर दुसरी सुरू असंच सध्या अक्षय कुमारचं सुरू आहे. या वर्षी अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतंच त्याने रामसेतू (Ram Setu)सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने Bachchan Pandey सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. आणि आता त्याला जॉली एलएलबी 3मध्येही काम मिळणार आहे.
या सिनेमाच्या मेकर्ससोबत अक्षयची बोलणीदेखील सुरू आहेत. जॉली एलएलबी 2चे दिग्दर्शक सुभाष कपूरशी अक्षयचं बोलणं सुरू आहे.
OMG: Oh My God! या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठीही अक्षय कुमारने होकार दिल्याचं कळतंय. मात्र या चित्रपटासाठी परेश रावल यांनी नकार दिल्याची माहिती आहे.
अक्षय कुमारचे कोण-कोणते सिनेमा लवकरच येणार?
1. सूर्यवंशी
2. बेल बॉटम
3. अतरंगी रे
4. पृथ्वीराज
5. बच्चन पांडे
6. राम सेतू
7. रक्षाबंधन