Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, ; शेतकरी चिंतेत - Maharashtra 24

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, ; शेतकरी चिंतेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १९ – पुणे – हवामानातील वारंवारच्या बदलांमुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा इथे सांयकाळी तुफान गारपीट झाली. विदर्भात हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. तो आज मेळघाटात खरा ठरला अचानकपणे चिखलदरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तर या ठिकाणी गारपीट देखील झाली. (Weather Report heavy rain in madhya maharashtra vidarbha maharashtra rain update imd)

चिखलदरा इथल्या पंचबोल पाईटवर गारांचा खच साचला होता. त्यामुळे काही वेळातच रस्त्यावर झाडावर गारा पडल्याने या ठिकाणी काश्मीरसारखं वातावरण पहायला मिळालं. सध्या कोरोनामुळे मेळघाटात पर्यटकांची गर्दी कमी आहे. मात्र, आज या ठिकाणी झालेली गारपिटी मोजक्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे.नांदेडमध्येही गुरुवारी रात्री उशिरा हलका स्वरूपाचा पाऊस झाला. रिमझिम स्वरूपाच्या पावसाने गव्हू, हरभरा या पिकांचे नुकसान झालं आहे. हवामान खात्याने या पावसाचा इशारा आधीच दिला होता. दरम्यान, पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.हिंगीलो जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापून टाकलेल्या गहू, हरबरा पिकांसह इतर पिकांच ही मोठं नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पुढील चार दिवस वातावरणात मोठा बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वातावरण बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य भारतातील वातावरण बदलाचा महाराहस्त्राच्या आतील भागात अधिक परिणाम होईल. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होईल. मुंबई आणि कोकण परिसरात पावसाची शक्यता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *